Maharastra Politics: 'आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता तर...', जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर सडकून टीका!

Shivrajyabhishek Sohala:  तारखेआधी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

Updated: Jun 2, 2023, 04:19 PM IST
Maharastra Politics: 'आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता तर...', जितेंद्र आव्हाडांची शिंदे सरकारवर सडकून टीका! title=
Shivrajyabhishek Sohala 2023,Jitendra Awhad

Jitendra Awhad On Shivrajyabhishek Sohala 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 2 जून रोजी रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवराज्याभिषेकाला (Shivrajyabhishek Sohala 2023) आता तब्बल 350 वर्ष पूर्ण होत असल्याने आता शिवभक्तांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. अशातच आता तारखेआधी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खडाजंगी सुरू झाल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथं मात्र निवडणूकांचं गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असं राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणाऱ्यांनी माफी मागावी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असं म्हटलं. तेच आज तिथं जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सडकून टीका केली आहे.

पाहा ट्विट 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने आजपासून 7 जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राजगडावर उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी सांगितलं आहे.

आणखी वाचा - रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्यातून मोठी बातमी, नाराजीनाट्य समोर

मुख्यमंत्री काय म्हणाले ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे रयतेचे राज्य होते. सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतले. त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालिन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.