Kandepohe : नोकरदारवर्गासाठी आणि घरापासून दूर बाहेरगावी गेलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बाहेरून नाश्ता-पाणी घेण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु आता तुम्हाला येण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सर्वसामान्यांसाठीचा नाश्ता आता महागला आहे. पोह्यांच्या दरात क्विंटलला 200-300 रूपयांची दरवाढ झाली आहे. त्यातून सध्या कच्च्या मालाचा तुटवडा पाहायला मिळतो आहे आणि उत्पादन खर्चातही वाढ झाल्याचे पाहायला मिळतं आहे. त्यामुळे नाश्ता चालकांनी नाश्त्याचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कांद्याचा वांदा...
देशांतर्गत कांद्याची आवक वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्या भावामध्ये तब्बल प्रतिक्विंटल 300 रुपयांनी घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गत सप्ताहात कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1250 रुपये भाव होता. मात्र आज लिलाव सुरू होताच क्विंटलला 925 रुपये इतका सरासरी भाव मिळाला.देशांतर्गत असलेल्या पटना, सिल्लीगुडी, बिहार आदींसह स्थानिक बाजारपेठेत कांद्याची मोठी आवक वाढल्याने भाव कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे..दरम्यान, कांद्याचे भाव कमी झाल्याने उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्यानेच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर गावच्या हद्दीत कांद्याने भरलेला ट्रक तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी सर्व रस्त्यावर कांदे विखुरले गेले आहेत यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्यावरून कांदे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे मात्र या अपघातामुळे कांदेव्यवसायिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.