कोल्हापुरातील 'तो' रुग्ण कोरोनाने दगावला नाही, डॉक्टरांचे स्पष्टीकरण

 त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट 

Updated: Mar 16, 2020, 10:06 AM IST
कोल्हापुरातील 'तो' रुग्ण कोरोनाने दगावला नाही, डॉक्टरांचे स्पष्टीकरण  title=

कोल्हापूर : कोल्हापूरला एक कोरोनाग्रस्त रुग्ण दगावला अशी बातमी समोर आली होती. पण त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  हा रुग्ण टेम्पो चालक आहे. त्याचा परदेश प्रवासाचा देखील इतिहास नसल्याचे राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे. 

संशयित मृत व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे, आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला अशी माहिती समोर आली होती. मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील राहणारी होती. पण कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं वास्तव्यास होता असे देखील सांगण्यात आले होते. पण हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

रुग्णांची संख्या ३२ वर 

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर गेली आहे. केईएममध्ये बुधवारपासून नवी मशिन आणि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे देखील रुगण चाचणीची क्षमता वाढणार आहे. १५ ते २० दिवसांच्या आत नवी लॅब सुविधा, प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे. महिन्याभरात मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबाद इथे लॅब उभारण्यात येणार आहेत. सेव्हन हिल्समध्ये ४०० बेड्स तयार करण्यात आले आहेत. एमपीएससी परीक्षा ३० मार्चनंतर घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

पंतप्रधनांची घोषणा 

सार्क देशांमध्ये यासंदर्भातीस १५०० प्रकरणे समोर आली आहेत. एकमेकांच्या सहाय्याने याच्याशी लढण्यास सोपे जाईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले. कोरोनाशी लढण्यासाठी सार्क देशांतकडून निधी उभारला जाईल. या निधीमध्ये १ कोटी डॉलर इतका निधी भारतातर्फे दिला जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. यातून उपकरणे खरेदी केली जातील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.