आजारपणाचा खर्च डोईजड; मुलाकडून वडिलांचा खून

वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे मुलाने जन्मदात्याला संपवले

Updated: Oct 6, 2019, 08:43 PM IST
आजारपणाचा खर्च डोईजड; मुलाकडून वडिलांचा खून title=

कोल्हापूर : वडिलांच्या आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे पोटच्या मुलाने जन्मदात्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीरमध्ये घडली आहे. नामदेव भास्कर असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते ६३ वर्षांचे होते.

नामदेव भास्कर हे सतत आजारी असायचे. आजारपणाचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांचा मुलागा गिरीश भास्कर यानं नामदेव यांचा गळा आवळून खून केला. या खून प्रकरणात गिरीशला त्याचा चुलता तुकाराम याने मदत केली. वैद्यकीय अहवालात गळा दाबुन खून केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी गिरीश आणि तुकारामला अटक केली.