Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली

Konkan Railway Monsoon timetable :  कोकणात जायचं म्हटलं की अनेकदा रेल्वेलाच पसंती मिळते. पण, या रेल्वेचं तिकीट मिळवणं म्हणजे मोठं आव्हानच.   

सायली पाटील | Updated: Mar 26, 2024, 03:10 PM IST
Konkan Railway चा मोठा निर्णय; आता गणेशोत्सवादरम्यानच्या तिकीटाचीही चिंता मिटली title=
Konkan Railway news to have additional trains till september indian railway latest news

Konkan Railway Monsoon timetable : कोकणात जाणाऱ्यांना रेल्वे विभागाकडून अनेकदा दिलासा दिला जातो. सणउत्सवांच्या निमित्तानं राज्याच्या या भागाकडे असणारा अनेकांचाच ओघ पाहता रेल्वे विभागही सातत्यानं प्रवाशांना रेल्वे सुविधा पुरवत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असतो. याच कोकण विभागानं आगामी (Monsoon 2024) मान्सूनचा हंगाम लक्षात घेत आतापासूनच रेल्वे विभागाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार विशेष बाब म्हणून होळीनिमित्त सुरु करण्यात आलेल्या नागपूर- मडगांव जंक्शन नागपूर या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांची सेवा थेट सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे. 

विषेश रेल्वेला मुदतवाढ देण्यापूर्वी ही सेवा 31 मार्चपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय झाला होता. पण, प्रवाशांच्या गरजा पाहता मध्य रेल्वेशी समन्वय साधत या गाड्यांचा विस्तार तूर्तास 9 जूनपपर्यंत करण्याचा निर्णय झाला आहे. पुढं ही सेवा सप्टेंबरपर्यंत वाढवली जाणार असल्याची माहितीही समोर येत असल्यामुळं आता प्रवाशांना थेट गणेशोत्सवापर्यंतच्या (Ganeshotsav 2024) तिकीटांमध्येही मोठा दिलासा मिळणार हेच स्पष्ट होत आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : '...तर याद राखा'; लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर मोदींकडून उमेदवारांना ताकीद

कोकण रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकानुसार नागपूर-मडगाव-जंक्शन ही गाडी 3 एप्रिल ते 8 जून दरम्यान प्रत्येक आठवड्यातून बुधवार आणि शनिवार अशा दोन दिवशी धावणार आहे. मडगाव जंक्शन- नागपूर ही विशेष गाडी 4 एप्रिल ते 9 जून दरम्यान पावसाळी दिवस वगळता आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. ही रेल्वेगाडी वर्धा जंक्शन, पुलगाव, शेगाव, मलकापूर, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, करमाळीसह इतर स्थानकांवर थांबेल,