Video : उस तोडणी सुरु असताना बिबट्या आला आणि...

 हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हल्ली शेतात बिबट्या किंवा बिबट्या (Cubs) पिल्लं अनेकदा गावकऱ्यांच्या नजरेस पडत आहे. बिबट्याच नाही तर अनेकदा सापही गावात अडकल्याच्या किंवा शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. 

Updated: Nov 22, 2022, 05:53 PM IST
Video : उस तोडणी सुरु असताना बिबट्या आला आणि... title=

तुषार तापसे, झी मीडिया, सातारा : सध्या प्राणी गावात किंवा घरात शिरण्याच्या घटना (Animal Viral Videos) आपण वारंवार पाहत असतो. त्यामुळे कुठेही जायची किंवा राहायची, खासकरून गावात. अशा भागात कुठेही बिबट्या किंवा वाघ - सिंह (lion Videos) शिरल्याच्या घटना ऐकल्या की आपल्यालाही सतर्क राहवं लागत त्यामुळे (Animals enterings Homes) अनेकदा आपण अशा घटनांपासून योग्य ती काळजी घेऊन असतो. सध्या असाच एक प्रकार कराडच्या (Karad News) एका गावात घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये (cctv) कैद झाला आहे. हल्ली शेतात बिबट्या किंवा बिबट्या (Cubs) पिल्लं अनेकदा गावकऱ्यांच्या नजरेस पडत आहे. बिबट्याच नाही तर अनेकदा सापही गावात अडकल्याच्या किंवा शिरल्याच्या घटना वारंवार पाहायला मिळतात. (leopard cubs found in karad satara rescued safely see viral video)

काय घडला प्रकार? : 

कराड वनवासमाची येथे सापडलेल्या तीन बिबट्यांच्या पिलांपैकी एका पिलाला मादी बिबट्याने घेऊन गेल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर (CCTV Footage) आला आहे.ऊसाचा शेतात तोडणी सुरू असताना ही तीन बिबट्याची पिल्ले सापडली होती. या सापडलेल्या ठिकाणी उसाच्या रानात पुन्हा एका क्रेट मध्ये ही पिल्ले (Leopard Cubs) ठेवण्यात आली.रात्री उशिरा पिलांचा वास घेत त्याची आई त्या ठिकाणी आली मात्र त्यातील एक पिल्लू घेवून निघून गेली.आज रात्री पुन्हा त्या दोन पिलांचे आई (Female Leopard) सोबत मिलन करण्यासाठी प्रयत्न वनविभागाकडून (Forest) केले जाणार आहेत. 

बिबट्या शिरल्याच्या वारंवार घटना : 

चोपडा तालुक्यातील कोळंबा इथल्या रहिवासी लताबाई दिलीप कोळी शुक्रवारी म्हणजे 9 सप्टेंबरला तापी नदी काठावर आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या.  चोपडा तालुका म्हटलं म्हणजे डोंगराळ भाग. इथं हिंस्त्र प्राण्यांचा नेहमीच वावर पाहिला मिळतो. लताबाई शेंगा तोडत (Leopard Entering In Village) असताना त्यांना बिबट्या शिकार करण्यासाठी कुत्र्याच्या पाठिमागे पळत असलेला दिसला. बिबट्या आपलीही शिकार करेल या भीतीने लताबाईंनी थेट दुथडी भरून वाहत असलेल्या तापी पात्रात उडी घेतली. बिबट्याच्या तावडीतून जीव वाचवण्यासाठी लताबाईंनी पाती नदीत उडी मारली आणि पाण्याच्या प्रवाहात त्या तब्बल 60 किलोमीटर (Kilometer) पोहत गेल्या. अंमळनेर तसंच पाडळसरे धरण ओलांडून त्या थेट तालुक्याच्या सीमेवरील निम नदी तीरावर पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 तारखेला इथल्या नाविकांना लताबाई एका केळीच्या खोडाला मिठी मारलेल्या अवस्थेत आढळून आल्या.

बिबट्या आणि चित्यात फरक काय? : 

चित्त्याचे खांदे बिबट्यांपेक्षा लांब असतात. ते बिबट्यांपेक्षा उंच दिसतात. चित्त्याचे सरासरी वजन 72 किलो असते. चित्ता जास्तीत जास्त 120 किमी प्रतितास वेगाने धावू शकतो. त्याचवेळी, बिबट्या मोठ्या मांजरींपैकी सर्वात लहान आहेत, जरी ते चित्तापेक्षा जड आणि मजबूत आहेत. बिबट्याचे वजन 100 किलो पर्यंत असते. चित्त्यापेक्षा बिबट्या (Leopard Vs Cheetah) जास्त मोठ्या मांजरापेक्षा लहान असतो. बिबट्या भक्ष्यावर हल्ला करण्यासाठी आणि पकडण्यासाठी त्यांची प्रचंड शक्ती वापरतात. बिबट्या त्यांचे भक्ष्य सुरक्षित ठेवण्यासाठी झाडावर घेऊन जातात.