Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 May 2024, 18:59 वाजता

'पाकिस्तानला शहजादा पंतप्रधान म्हणून हवाय', पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर टीका

 

PM Modi on Rahul Gandhi : पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरींनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं, त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केलाय ..शहजाद्याला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा आहे.. असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय.. गुजरातच्या आणंदमध्ये पंतप्रधान मोदींनी ही टीका केलीय..

2 May 2024, 18:18 वाजता

मुंबईत भाजप कार्यालयात घोषणाबाजी

 

Navi Mumbai BJP : नरेश म्हस्केंना ठाण्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीत ठिणगी पडलीये...नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेत..त्याचबरोबर नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले...आणि मुंबईतील भाजप प्रदेश कार्यलयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आलीये...ठाण्यात काय कमळ कमळ अशा प्रकारे घोषणाबाजीही करण्यात आली...शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिका-याच्या वक्तव्यामुळे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा बांध फुटल्याचं संदीप नाईक म्हणालेत...तर त्यांची नाराजी दूर केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय..तर महायुती आहे सर्व परिस्थिती निवळेल अशी प्रतिक्रीया नरेश म्हस्के आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीये...

2 May 2024, 17:38 वाजता

कैसरगंजमधून भाजपचे बृजभूषण सिंह यांचा पत्ता कट

 

Brijbhushan Singh : उत्तर प्रदेशच्या कैसरगंज ब्रृज भूषण सिंह यांचं खासदारकीचं तिकीट कापण्यात आलंय... त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा करण भूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलीये...बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटुंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते...

 

2 May 2024, 16:11 वाजता

अमेठीतून राहुल गांधीच उमेदवार?

 

Rahul Gandhi : कर्नाटकात राहुल गांधी आणि मलिक्कार्जुन खर्गेंमधील बैठक संपली...राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार...अमेठीतून राहुल गांधींची उमेदवारी निश्चित सूत्रांची माहिती...उद्या दुपारी राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

2 May 2024, 15:23 वाजता

नवी मुंबईत भाजप जिल्हा कार्यकारिणी नाराज

 

Navi Mumbai BJP : नवी मुंबईमधील भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीने राजीनामा दिलाय.....त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, भाजप आमदार गणेश नाईक यांना परतावं लागलंय...कार्यकर्त्यांचा रोष पाहता हे सर्व नेते परतलेत...भाजपच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणीने नाराज होत राजीनामे दिलेत...नरेश म्हस्केंना ठाण्यातून उमेदवारी दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं समजतंय

2 May 2024, 15:05 वाजता

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगावच्या मुक्ताईनगर आगमन झालं आहे. यावेळी ते रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी वर कार्यकर्त्यांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत

2 May 2024, 13:13 वाजता

अमित शाहांची उद्या रत्नागिरीत नारायण राणेंसाठी प्रचारसभा

 

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रत्नागिरीच्या दौ-यावर आहेत. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलीये. सध्या सभेची जोरदार तयारी सुरूये. दरम्यान अमित शहा कोकणवासियांना काय साद घालणार याची चर्चा रंगतेय.

2 May 2024, 12:47 वाजता

अमोल कोल्हे यांचे शिवाजीराव आढळराव पाटलांवर सनसनाटी आरोप

 

Loksabha Election 2024 : अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांवर सनसनाटी आरोप केलेत.. आढळरावांनी संसदेत जाऊन केवळ संरक्षण खात्याचे प्रश्न मांडले, यामागे स्वत:च्या कंपनीसाठी कंत्राटं मिळवण्याचा त्यांचा हेतू होता.. असा गंभीर आरोप अमोल कोल्हेंनी केलाय.. तर पराभव दिसत असल्यानं कोल्हे आरोप करत असल्याचं आढळरावांनी म्हटलंय. आढाळरावांनी आपण कोणते प्रश्न संसदेत मांडले यावरही स्पष्टीकरण दिलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 May 2024, 12:18 वाजता

Ambadas Danve On Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या सनसनाटी आरोपांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिलीय. शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री करणार नाही हे माहिती असतं तर फडणवीस फोडाफोडीत असते का.. असा सवाल दानवेंनी विचारलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 May 2024, 12:02 वाजता

मतदान टक्केवारीवर संजय राऊतांचा संशय

 

Sanjay Raut : संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर टीका करताना मतदानाच्या टक्केवारीवर संशय व्यक्त केलाय. मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यासाठी 11 दिवस का लागले, वाढलेलं मतदान कुणी केलं असे सवाल राऊतांनी उपस्थित केलेत.. महाराष्ट्रात 19 आणि 26 एप्रिलला मतदान झालं मात्र निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी 30एप्रिलला जाहीर केली यावर राऊतांनी निशाणा साधलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -