Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

2 May 2024, 10:31 वाजता

ठाकरे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात - बावनकुळे

 

Chandrashekar Bawankule : उद्धव ठाकरे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात असा आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 May 2024, 10:01 वाजता

फडणवीस बोलतात ते कपोलकल्पित असतं - शरद पवार

 

Kolhapur Sharad Pawar : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती, या उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर पवारांनी प्रतिक्रिया दिलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 May 2024, 08:30 वाजता

ठाकरेंच्या माजी नगरसेवकाची घरवापसी

 

Kalyan : कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटाचे माजी नगरसेवक पुरषोत्तम चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केलाय.. कामासाठी गेलो असता थेट पक्षप्रवेश करुन घेतल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय.. चव्हाण यांनी एक दिवसापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र त्यांनी लगेचच घरवापसी केलीये.. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केलाय.. या प्रकारनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीये.. दरम्यान शिंदे गटानं हे आरोप फेटाळून लावले असून हे षडयंत्र असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

2 May 2024, 07:04 वाजता

देवेंद्र फडणवीसांचा 'झी 24 तास'वर मोठा गौप्यस्फोट

 

Devendra Fadanvis Exclusive Interview : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती, असा सनसनाटी गौप्यस्फोट फडणवीसांनी केलाय.. झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली... २०२२ ला सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असं त्यांनी सांगितलं. मात्र वेळ निघून गेली होती, असं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं.