Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा, एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा विदर्भ दौरा, एक दिवस नागपुरात करणार मुक्काम

18 Apr 2024, 21:03 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : अमरावतीत संजय राऊतांविरोधात रवी राणा आणि भाजपचे कार्यकर्ते आक्रमक, संजय राऊत यांच्या विरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी, महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांची काही प्रमाणात झटपट,  संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने महिला आक्रमक, संजय राऊत यांच्या पोस्टरला महिलांनी मारल्या चपला

 

18 Apr 2024, 20:11 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील भागात निवडणूक पथकांना हेलिकॉप्टरने मतदान केंद्रावर पाठविण्यात येत आहे.

18 Apr 2024, 19:35 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या नागपुरात मुक्काम, 20 एप्रिलला नागपुरातून परभणीला प्रचारसभेसाठी जाणार, उद्या 19 एप्रिल वर्धामध्ये जाहीर सभा होणार 

18 Apr 2024, 19:09 वाजता

अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात

एकीकडे महायुतीकडून दक्षिण मुंबईतून अजून कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले नाही, तर दुसरीकडे याचं मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. अरविंद सावंत यांच्या प्रचाराचा नारळ आज आदित्य ठाकरे शाखा भेटी देऊन फोडणार, आज कुलाबा मधील नेव्हीनगर आणि मुंबादेवी परिसरात आदित्य ठाकरे साधणार शाखा संवाद

18 Apr 2024, 17:41 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :
संभाजी भिडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट घेतली. कवलापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस आणि संभाजी भिडे यांची झाली भेट झालीय. दोघांतमध्ये विमानतळावर बातचीत झाली. यावेळी संभाजी भिडेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत कानगोष्टी केल्यात.

 

18 Apr 2024, 13:42 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates :
पुण्यातल्या सभेतून सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई.. असा सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा उल्लेख बाहेरचे पवार असा केलेला होता, त्यावर फडणवीसांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. तर अबकी बार सुनेत्रा पवार.. बारामतीत आता भाकरी फिरवायची वेळ आलीय.. असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. 

18 Apr 2024, 13:05 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना धक्का 

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना धक्का. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी केला शिवसेनेत प्रवेश केला असून, आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून पुढचा राजकीय प्रवास करतील. भोर वेल्हा परिसरातील अनेक कार्यकर्ते घेऊन कुलदीप कोंडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा करत होते प्रचार आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत  शिवसेने गटात कुलदीप कोंडे यांचा प्रवेश केल्यामुळं राजकीय तिढा वाढला. 

18 Apr 2024, 11:47 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : उदयनराजेंची शरद पवारांवर टीका 

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या साताऱ्यातील उमेदवार विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली. रयत शिक्षण संस्थेच्या कारभाराबाबत टीका करताना रयतच्या घटनेत मुख्यमंत्री हे अध्यक्ष असताना त्यात बदल करण्यात आला... असं म्हणत शरद पवारांवर नाव न घेता टीका केली. 

18 Apr 2024, 11:22 वाजता

रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

 

Narayan Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय...यावेळी किरण सामंतांनी माघार घेतलीय...उद्याच नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत...राणेंची थेट लढत आता ठाकरे गटाच्या विनायक राऊतांसोबत होणार आहे...त्यामुळे कोकणात लोकसभा निवडणुकीत धुमशान पाहायला मिळणाराय...

18 Apr 2024, 11:21 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नारायण राणेंना पाठिंबा 

उदय सामंत यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान काही गोष्टी स्पष्ट ,करत किरण सामंत यांचा नारायण राणे यांना पाठींबा असेल असं जाहीर केलं. त्यामुळं रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघातून आता नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे.