'हे ऋषिकेश आहे बँकॉक किंवा गोवा नाही', विदेशी पर्यटकांचा गंगा काठीचा VIDEO पाहून नेटकरी संतापले

Ganga River Viral Video : गेल्या काही वर्षांमध्ये ऋषिकेश हे विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण झालंय. धार्मिक महत्त्व असलेल्या या ऋषिकेशमधील विदेशी पर्यटकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Apr 30, 2024, 01:49 PM IST
'हे ऋषिकेश आहे बँकॉक किंवा गोवा नाही', विदेशी पर्यटकांचा गंगा काठीचा VIDEO पाहून नेटकरी संतापले  title=
This is Rishikesh not Bangkok or Goa netizens were outraged after seeing the viral video foreign tourist enjoying in ganga river

Ganga River Viral Video : भारतात मोठ्या संख्येने विदेशी पाहुणे फिरण्यासाठी येतात. गोवा आणि थंड हवीची ठिकाणे ही त्यांची आवडती ठिकाणं आहेत. काही पर्यटकांचं धार्मिक स्थळांकडेही कल वाढलेला दिसून येतो आहे. ऋषिकेश हे हिंदूचं धार्मिक स्थळ असून गंगा मातेच्या आरतीसाठी इथे भारतीयांसह मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटकही येतात. भारतीयांसाठी गंगा ही पवित्र नदी आहे. अशातच एका विदेशी तरुण तरुणींचा ऋषिकेशमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. 

ऋषिकेश गंगा काठी हे काय चालू आहे?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक विदेशी तरुण तरुणींचा ग्रूप गंगा नदीत मजा मस्ती करताना दिसत आहेत. अनेक विदेशी तरुणींनी बिकीनी घातली आहे तर तरुणांनी शॉर्टस घातले आहेत. खरं तर असे दृष्यं गोव्या किनारी पाहिला मिळतं. पण ऋषिकेशमध्ये गंगा नदीत विदेशी पर्यटकांची ही अशी मस्तीचा व्हिडीओ पाहून नेटकरी वैतागले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील Himalayan Hindu या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ शेअर करताना नेटकराने लिहिलंय की, 'धन्यवाद पवित्र गंगा नदी काठाला गोव्या बनवल्याबद्दल. आता अशा गोष्टी ऋषिकेशमध्ये घडत असून लवकरच त्याचे मिनी बँकॉक होईल.'

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये विदेशी तरुण तरुणींचा ग्रूप रेव्ह पार्ट्यांच्या स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन देण्यात आलंय की, ऋषिकेश हे आता धर्म, अध्यात्म आणि योगाचे शहर राहिलेले नाही. गोवा झाला आहे. ऋषिकेशमध्ये अशा रेव्ह पार्ट्या/झॉम्बी कल्चरला प्रोत्साहन का दिले जात आहे? देवभूमी या कारणासाठी ओळखली जाते का? त्यांनी या पवित्र शहराचा नाश करण्यापूर्वी काहीतरी केले पाहिजे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ शेअर करताना नेटकऱ्याने उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना टॅग केलंय.