Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.   

सायली पाटील | Updated: May 16, 2024, 10:50 AM IST
Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले title=
Loksabha election 2024 Sharad pawar targets pm modi over mumbai road show says this

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग आलेला असतानाच सुरुवातीपासूनच निवडणुकीच्या या धामधुमीत स्वत:ला झोकून देणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली राष्ट्रवादीपासून, मुंबईतील रोड शोसंदर्भात पवारांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेदरम्यान भाष्य केलं. यावेळी मोदींचा 'आत्मविश्वास गेला आहे' या त्यांच्या वक्तव्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढासळला असल्यामुळे ते भरकटले आहेत असं पवार म्हणाले. (Narendra Modi) नरेंद्र मोदी हे प्रचार भाषणात धार्मिक आरक्षण आणि इतर भूमिका घेताना दिसत आहेत त्यासंदर्भातील प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं. 'मोदी सीएम असताना गुजरातचे प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे. शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी मोदी मला गुजरातला घेऊन जायचे. मोदींना मी इस्रायलला घेवून गेलो होतो. आता मात्र राजकारण करण्यासाठी ते माझ्यावर टीका करत आहेत', असं ते म्हणाले.  

पंतप्रधानांसोबतच भाजपच्याही एकंदर भूमिकेवर शरद पवार यांनी टीका करत कांदा उत्पादकांचं मोदींकडून मोठं नुकसान झाल्याचं रोखठोक वक्तव्य केलं. कांदा प्रश्नाचा भाजपला पटका बसणार, असा थेट इशारा देत त्यांनी यावेळी केंद्राच्या कांदा धोरणावर टीका केली. 

हेसुद्धा वाचा : उन्हाळी सुट्टीसाठी माथेरानला जाताय? आधी हे पाहून घ्या 

मुंबईतील रोड शो शहाणपणाचं लक्षण नाही...  

मुंबईतील मोदींच्या रोड शोवरून राऊत आणि शरद पवारांनी टीका केली. मुंबईत रोड शो काढणं हे शहाणपणाचं लक्षण नाही, असं म्हणत  शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या या भूमिकेबाबत नकारात्मक सूर आळवला. मोदींनी रोड शो काढला तो प्रामुख्यानं गुजराती भाग होता असा टोलाही पवारांनी लगावला. तर, मुंबईत 16 लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींचा रोड शो काढणं हे अमानुष असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

नाशिक आणि राज ठाकरेंसंदर्भात काय म्हणाले पवार? 

एकिकडे नकली राष्ट्रवादी या मोदींच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर, देताना मोदींकडे बोलण्यासाठी आता दुसरं काही उरलं नाही असं सांगणाऱ्या शरद पवार यांनी जिरेटोप मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेल यांच्यावर शाब्दिक तोफ डागली. 'लाचारीची देखील मर्यादा हवी', असं पवार म्हणाले. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांच्याविषयी नजरा वळवणारं वक्तव्य त्यांनी केलं. 'महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं काय स्थान आहे, हे माहित नाही. नाशिक त्यांचा गड म्हणून सांगितलं जात मात्र ते नाशिकमध्ये कुठे दिसत नाहीत असं ते थेटच म्हणाले.