महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट

LokSabha Election 2024 : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच महादेव जानकर बारामतीतून लढणार अशी चर्चा असताना नवा ट्विस्ट आलाय. आता जानकर बारामतीतून नाही, तर परभणीतून लढणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Mar 26, 2024, 03:09 PM IST
महादेव जानकरांचं ठरलं! बारामती नाही, तर परभणीतून...पण घड्याळ की कमळ हे अस्पष्ट title=
Mahadev Jankar will not contest from Baramati but from Parbhani Loksabha Election 2024

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच बारामतीत नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी समाज पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांची घरवापसी झाली आहे. लोकसभेसाठी एक जागा मिळेल या अटीवर ते परतले आहेत. अशी चर्चा होती की महादेव जानकर बारामतीतून निवडणूक लढणार होते. पण आता ते परभणीतून लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जानकरांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनिती असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे. मात्र महादेव जानकर हे जरी परभणीतून लढवणार असले तरी ते घड्याळ की कमळ कुठल्या चिन्हावरून लढणार ते अद्याप अस्पष्ट आहे. (Mahadev Jankar will not contest from Baramati but from Parbhani Loksabha Election 2024 )

हेसुद्धा वाचा - Loksabha Election 2024: ठाकरेंचं फिस्कटलं पण पवारांचं ठरलं! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'या' तारखेला पहिली यादी, 'इतक्या' जागा लढणार

बारामतीमध्ये नणंद आणि भावजयी लढत पाहिला मिळणार असं सगळ्यांना वाटतं. मात्र अजित पवार सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी महादेव जानकर यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती. त्या चर्चांना पूर्ण विराम लागलं, अशी सूत्रांची माहिती आहे. कारण आता महादेव जानकर परभणीतून लोकसभा निवडणूक लढविणार असं सांगितलं जातंय. 

 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांना बारामतीतून उमेदवारी देण्याची त्यांची रणनिती होती. मात्र जानकरांनी परभणीतून निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट केलंय. महायुतीकडून रासपला परभणीची जागा सोडण्यात आल्याच त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र परभणीची जागा महायुतीत कोणाला जाणार हे अद्याप ठरलेलं नाही. ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार असं म्हटलं जातं. अशातच जानकर नेमकं कुठल्या चिन्हावरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेले नाही. 

पण काही दिवसांपूर्वी जानकर यांनी पत्रकाराशी संवाद साधताना म्हटलं होतं की, रासपच्या चिन्हावर त्यांचा एकच आमदार निवडणूक आला आहे. त्यामुळे यंदाही लोकसभा निवडणूक जानकर हे रासपच्या चिन्हावरच लढवणार असल्याच ते म्हणाले होते.