कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Updated: Jun 1, 2018, 01:33 PM IST

बुलढाणा : कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. फुंडकरांना निरोप देण्यासाठी मोठा जनसागर खामगावात लोटला होता.  त्यांना निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, हंसराज अहिर, गिरीश महाजन, सदाभाऊ खोत, रणजीत पाटील, खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती होती.

पांडुरंग फुंडकर यांचं गुरुवारी मुंबईत ह्रदयविकाराचा तीव्र झटक्यानं निधन झालं. बुधवारी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे फुंडकर यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते. शेतकऱ्यांचा समस्यांची जाणीव असणारा नेता हरपल्याची भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.