हायपूरलूप : मुंबई-पुणे प्रवास फक्त २५ मिनिटांत

अखेरच्या टप्प्यात या पथकाने  नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप कंपनीच्या  चाचणी केंद्रास भेट दिली.

Updated: Jun 16, 2018, 11:53 PM IST

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्वाचे पाऊल पडलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला आज भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना सेवा अधिक गतीने देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. आज दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात या पथकाने  नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप कंपनीच्या  चाचणी केंद्रास भेट दिली.

वाहतूक कोंडीतून सुटका 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या 100 टक्के इलेक्ट्रीक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.