नवी मुंबई कात टाकणार! देशातील पहिलं शहर ठरणार जिथे...; शासनाकडे पाठवला प्रस्ताव

Development Plan : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर तब्बल 33 वर्षानंतर प्रथमच शहराचा संपूर्ण विकास आराखड राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, महापालिकेने प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आणि त्यावरील हरकती आणि सूचना मागवल्या होत्या. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 25, 2024, 10:32 AM IST
नवी मुंबई कात टाकणार! देशातील पहिलं शहर ठरणार जिथे...; शासनाकडे पाठवला प्रस्ताव  title=

Navi Mumbai Municipal Corporation In Marathi : नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेला 30 वर्षांनंतर अखेर पालिका प्रशासनाला स्वतःचा विकास आराखडा मिळणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्याचा अंतिम आराखडा राजपत्रात प्रसिद्ध झाला आहे. त्यानंतर विकास आराखड्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर नवी मुंबई आणखी चकमकीत पाहायला मिळणाहे.

महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने 10 ऑगस्ट 2022 रोजी मसुदा विकास आराखडा तयार केला. यावर नागरिकांना हरकती व सूचना देण्यास मुदत दिली होती. दरम्यान तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर यांच्या कार्यकाळात नियोजन समितीने 16 हजार 194 बैठका व सुनावणी घेऊन माहिती घेतली. या सुनावणीच्या अंतिम अहवाल महापालिकेला सादर केला गेला. या अहवालातून आलेल्य  हरकती व सूचनांतील बदलानुसार तयार झालेला मुख्य मसुदा राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक होते. त्यानुसार 23 फेब्रुवारी 2024 ला महापालिकेने विकास आराखड्याचा मसुदा राजपत्रात प्रसिद्ध केला. 

आत महापालिकेने राज्य सरकारकडे योजना आणि विकास आराखड्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरीची कागदपत्रे दिली आहेत. यापुढे पालिकेने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारची मते सहसंचालक कोकण भवन आणि संचालक नगर रचना पुणे यांच्याकडून मागवली जाणार आहेत. यासाठी किमान सहा महिने ते कमाल एक वर्षाचा कालावधी अभिप्रेत आहे. या विकास आरखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात विकास आराखडा कार्यान्वित होणार आहे.

या विकास आराखड्यांतर्गत रस्ते विकास, सामाजिक कार्यासाठी भूखंड, मंडई, मैदाने, उद्याने, सायकल ट्रक, मनोरंजनाची ठिकाणे, ठाणे व बेलापूर मार्गावरील पर्यायी मार्ग तयार करण्यात आले असून 2038 पर्यंतचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल 33 वर्षानंतर प्रथमच नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास प्राधिकरणास मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 

पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी सोय

नवी मुंबई परिसरातही पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेरूळ एमआयडीसी परिसरात आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. अशी योजना राबविणारी नवी मुंबई महापालिका ही ही देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

नवी मुंबईकरांना मिळणार या सुविधा 

लहान मुलांसाठी खेळण्यासाठी नेरूळ सेक्टर 2 व सेक्टर 8 आणि बेलापूर सेक्टर 21 व 22 अशा तीन ठिकाणी मैदाने आरक्षित करण्यात आली आहेत. तसेच सिडकोनिर्मित मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्बांधणी लक्षात घेत आवश्यक रुंदी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने नियोजनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता रुंद करता येणार आहे. विकास आराखड्यात एका प्लॉटचा वापर करून एकापेक्षा जास्त कार्यकारणभाव विकसित करत आहे. मोडकळीतील इमारतींच्या पुनर्विकासादरम्यान मोकळ्या जागेचा वापर करण्याबाबत सवलत देण्यात आली आहे.