Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच

Maharashtra Weathert News :  राज्याच्या कोणत्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा? कुठे वाढणार सूर्याचा प्रकोप...जिल्ह्याजिल्ह्यातील हवामानाचा आढावा   

सायली पाटील | Updated: Apr 5, 2024, 07:47 AM IST
Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच  title=
Maharashtra Weather Forecast news rain predictions in marathwada vidarbha latest updates

Maharashtra Weathert News : हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या वातावरणाच्या खालच्या थरात असणारी द्रोणिकारेषा तामिळनाडूच्या दक्षिणेुपासून मध्य प्रदेशापर्यंत जात आहे. पुढं हीच रेषा विदर्भातूनही जात असल्यामुळं राज्यातील हवामान कोरडं राहणार आहे. तर, हवेच्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं काही भागांमध्ये ढगाळ वातावरण अडचणी वाढवताना दिसय़णार आहे. दिवसा वाढणाऱ्या उकाड्याचे परिणाम रात्रीपर्यंत दिसणार असून, राज्याच्या काही भागांमध्ये सूर्य मावळतीला गेल्यानंतरही तापमानाच मात्र फारशी घट अपेक्षित नाही. 

हवामानातील या बदलांमुळं सध्या अवकाळीला पोषक वातावरण तयार होत असून, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढं 6 ते 8 एप्रिलदरम्यान मराठवाड्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल, पण हा पाऊस मध्यम स्वरुपातील राहणार आहे. 

आठवड्याअखेरीस राज्यातील नाशिक, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी असेल. तर, पुढच्या 48 तासांमध्ये पुण्यासह नजीकच्या भागांमध्ये आकाश निरभ्र राहणार असून, निवडक भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळणार आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्यामुळं गुजरातच्या दिशेनं आर्द्र वारे वाहत आहेत. ज्यामुळं हे उष्ण वारे महाराष्ट्राच्याही दिशेनं येत असून, पालघर, ठाणे, मुंबईसह रायगडमध्ये उकाडा वाढवताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य 

राज्यात एकिकडे पावसाळी वातावरणाचे संकेत असतानाच दुसरीकडे विदर्भात उकाडा अडचणींमध्ये भर टाकताना दिसणार आहे. राज्यात सध्या चंद्रपूर, वर्धा येथे पारा 42 अंशांवर पोहोचला असून, पुढच्या 24 तासांमध्ये या भागांसह यवतमाळ, नागपूरमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मालेगाव, सोलापुरातही चित्र काहीसं असंच असेल.