ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा

मुंबईसह महाराष्ट्रात पारा चाळिशी गेला आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. 

Updated: Apr 17, 2024, 07:23 PM IST
ऊन, वारा, पाऊस... राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलतय; मुसळधार पावसासह उष्णतेच्या लाटेचा इशारा title=

Maharashtra Weather : सध्या राज्याच्या तापमानत कमालीचे बदल होत आहेत. राज्यातील तापमान क्षणाक्षणाला बदलत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे नागरीक उकाड्याने हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. सांगसीलह पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसासह  उष्णतेच्या लाटेचा इशारा हवान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

पुण्यात सलग तिस-या दिवशी पावसाला सुरूवात झालीये...वादळी वा-यासह पाऊस पडतोय...तर वाघोली परिसरात गारांचा मारा झाला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. तर दुसरीकडे राज्यभरात उष्णतेची लाट पसरलीये. सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत आहे. हवामान खात्यानंही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, पारा चाळीशीच्या पार पोहचला आहे.  तसंच मुंबईमध्येही प्रचंड उष्णता वाढली आहे. 

सागंलीत वादळी वाऱ्यासह,अवकाळी पाऊस तर काही भागात गारांचा पाऊस

सांगली शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर, काही भागात गारांचा पाऊस पडला आहे.  जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकाना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेले काही दिवस तापमानात वाढ झाली आहे. आज अचानक पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकानी गारा ही पडल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस

अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला आहे. अकोले तालुक्यातील राजूर परीसरात पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने नागरीकांची धावपळ उडाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस कोसळ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार

पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. शहर आणि उपनगरात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे  37°C आणि  27°C च्या आसपास असेल. कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाणी उष्ण रात्र असण्याची शक्यता आहे. कोंकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि  विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहाणार आहे.  प्रतितास 30-40  किमी वेगाने वारे वाहतील. तसेच  हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मालेगावच्या तापमानाचा पारा 43.2 अंशावर

नाशिकच्या मालेगावमध्ये तापामानात सतत वाढ पाहायला मिळत असून आहे. आग ओकणाऱ्या सूर्यनारायणामुळे मालेगावच्या तापमानाचा पारा 43.2 अंशावर पोहचलाला असून हे या वर्षीच्या हंगामातील सर्वांधिक तपामान नोंदले गेले. दोन दिवसांपासुन 42 अंशावर असणारे तापमान थेट 43.2. अंशावर पोहचल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे