Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Updated: Mar 10, 2023, 08:55 AM IST
Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा title=

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. (Maharashtra Weather ) शेतकरी अडचणीत सापडला आहे. ( Rain News) कांद्याला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आणले गेले आहेत. त्यातच अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ( Maharashtra Rain) आता पुन्हा एकदा राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (farmers warning) त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हातातोंडाशी आलेले पिक वाया जाण्याची भिती व्यक्त होत आहे.

या तीन जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट कायम

उत्तर महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. (farmers warning of unseasonal rain in three districts namely Nashik Dhule Nandurbar ) 13 मार्चला या तीन जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याच,सोबत 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील असं सांगण्यात येते आहे.

 गेल्या तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे राज्यात हाहाकार उडवलाय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रबीचं पीकही हातचं गेलंय. त्यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडलाय. त्यातच आता पुन्हा एकदा वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे शेतक-यांनी उर्वरित पीक वाचवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी 

देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आता महाराष्ट्रातही (Maharashtra Weather Update ) पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात तीन जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतामध्ये 9 ते 11 मार्च या कालावधीत वादळी वाऱ्यांसह पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Uttarakhand) उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे या भागांतील तापमानाच काही अंशांची घट नोंदवली जाऊ शकते, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात कोकणासह शेजारी राज्य गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टी  (Goa Weather Update ) भागात येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गरज असल्यासच दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका अन्यथा घरात राहा असे आवाहनही करण्यात आले आहे.