Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 7, 2024, 10:56 PM IST
Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता  title=
Unseasonal rain in Maharastra

Maharastra Weather Update : हिवाळ्यात पावसाने अचानक हजेरी लावल्याने आता शेतकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूरात पावसाचा इशारा देण्यात आलाय. खान्देशातील काही भाग आणि नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

विदर्भ वगळता राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर तीन दिवसानंतर ढगाळ वातावरण कमी होऊन पुन्हा थंडी पडण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केलीये. अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने अवकाळी संकट कोसळल्याचं समोर आलंय. थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या संयोगामुळे काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. 

राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याचीही शक्यता आहे. जळगावात सर्वात कमी 12.4 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तर धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना मंगळवारी यलो अलर्ट मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडल्याचं पहायला मिळतंय.

दरम्यान, महाराष्ट्रमध्ये पश्चिमी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वायव्य दिशेकडून येणारे वारे व आग्नेय दिशेकडून येणारे आर्द्रता युक्त वारे यांच्या परस्पर क्रियेमुळे मध्य भारतात तसेच महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. तर पालघर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा सारख्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे रोगराई पसरण्याचा ही धोका या अवकाळी पावसामुळे होऊ शकतो.