मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी

Manoj Jarange :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. 

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2024, 10:45 AM IST
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, आरोग्य तपासणीसाठी नकार दिल्यामुळे डॉक्टरांचं पथक फिरलं माघारी title=
Manoj Jarange Patil Hunger Strike health deteriorated the team of doctors turned back due to his refusal to undergo a health check up maratha reservation antarwali sarathi news

Manoj Jarange :  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठवाड्यातील जालन्यातल्या अंतरवली सराटी इथे ते उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा तिसऱ्या दिवस आहे. सरकारने तातडीने विशेष अधिवेश बोलवून सग्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाच हत्यार उपसलंय. दरम्यान पाण्याचा एक थेंब पोटात न गेल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती कालपासून खालावली आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्या असून त्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा राज्य सरकारला दिलाय. (Manoj Jarange Patil Hunger Strike health deteriorated the team of doctors turned back due to his refusal to undergo a health check up maratha reservation antarwali sarathi news)

त्यात सलग तिसऱ्या दिवशी जरांगे-पाटलांनी आरोग्य तपासणीसाठी नकार दिला. त्यामुळे आल्या पाऊली डॉक्टरांचं पथक माघारी फिरलंय. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय, त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलीय. जरांगे उपचार घेत नसल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतोय.