Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन

  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

सायली पाटील | Updated: Oct 30, 2023, 09:36 AM IST
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा...; जाणून घ्या कनेक्शन  title=
Maratha reservation protest Manoj jarange gets support from kerala know the connection

विशाल सवने, झी मीडिया, केरळ:  Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

केरळमध्ये ( Keral Maratha Protest ) वास्तव्यास असणाऱ्या 50 हजार मराठ्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे राज्यातूनच नाही तर राज्याबाहेरून देखील  मराठा समाज जरांगे पाटील यांचे आंदोलनात हात बळकट करण्यासाठी एकवटला आहे. 

मराठा आंदोलन आणि केरळ राज्य 

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा अध्याय सुरु आहे. मात्र मागच्या उपोषणापेक्षा यंदाचं उपोषण अत्यंत कठोर असल्याचं दिसतंय. जरांगे पाटील यांनी पाण्याचा सुद्धा त्याग केलाय. इतकंच नव्हे तर त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास देखील नकार दिलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठे सुद्धा गावागावात आंदोलन करु लागले आहेत. याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून केरळमध्ये असणाऱ्या मराठा वेल्फेअर असोसिएशन, अड्डूर केरळ यांच्यावतीने एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत एकमताने जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. मराठा वेल्फेअर असोसिएशचे अध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले की, मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहतोय. आम्ही सर्वजन सातारा आणि सांगली भागातून येथे आलोय. आज मराठ्यांसाठी जरांगे पाटील उपोषण करतायत. या त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतोय. सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी देखील केलीय"

केरळमध्ये मराठे आले कसे! 

मराठा समाजाची सर्वाधिक संख्या ही निर्विवादपणे महाराष्ट्रात आहे. मात्र इतिहासात परकीय आक्रमण थोपवण्यासाठी तसंच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या समवेत लढत असताना मराठा समाज देशाच्या अन्य भागात गेल्याच्या नोंदी आहे. त्यातील काही मराठे हे त्याच राज्यात वास्तव्य करु लागले आणि तिथेच स्थायिक सुद्धा झाले. 

हेसुद्धा वाचा : मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा दिवस! जरांगेंच्या उपोषणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक

 

केरळमध्ये राहणारा मराठा हा तिथे सोने व्यापार करण्यासाठी गेलेला आहे. सुरुवातील तिथे असणाऱ्या सोने गाळण उद्योगामध्ये महाराष्ट्रातील अनेक तरुण तिथे जाऊन स्थायिक झाले. या क्षणाला केरळ राज्यात 50 हजारपेक्षा जास्त मराठा बांधव राहत असल्याची नोंद आहे. कधी काळी सोने गाळण्यासाठी गेलेल्या मराठ्यांच्या केरळमध्ये सोन्या चांदीच्या आज पेढ्या आहेत. अशा या समुदायानं थेट केरळातून जरांगेंना पाठींबा दिल्यामुळं आता आंदोलनात आणखी समर्थकांची भर पडल्याचं स्पष्ट होत आहे.