Measles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक

Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.  

Updated: Dec 4, 2022, 11:29 AM IST
Measles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक title=

Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय. (Measles) या बैठकीत खासगी वैद्यकीय यंत्रणांचाही सहभाग असेल. गोवरचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेले जिल्हे, कुपोषण अधिक असलेले भाग, लसवंचित बालकं या प्रमुख मुद्द्यांचा विचार करून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. (Maharashtra News in Marathi)  

93 ठिकाणी गोवरचा उद्रेक 

राज्यभरात गोवरचे 800 हून अधिक रूग्ण आढळले आहेत. तर संशयित रूग्णांची संख्या 12 हजारावर गेलीय. राज्यात यावर्षी एकूण 93 ठिकाणी गोवरचा उद्रेक झालाय. टास्क फोर्स आणि गोवर मृत्यू विश्लेषण समितीच्या निरिक्षणाप्रमाणे गोवरमुळे होणा-या मृत्यूंमध्ये कुपोषण आणि लसीकरणाचा अभाव ही प्रमुख कारणं आढळली आहेत. त्यामुळे गोवरमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुपोषित मुलांवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे. 

मुंबईत गोवरबाधितांची संख्या 386 वर

मुंबईत गोवरबाधितांची (Measles) संख्या 386वर गेलीय. काल दिवसभरात गोवरचे 15 रूग्ण आढळले आहेत. (Mumbai Measles Outbreak) तर 75 संशयित रूग्ण काल दिवसभरात आढळले. मुंबईत फोर्ट भागासह ग्रँटरोड, सायन, माहिम, दादर, धारावी, वांद्रे, कांदिवली, कुर्ला, गोवंडी, चेंबूर, भांडुप, घाटकोपर या भागात रुग्णसंख्या कमालीची वाढतेय. गोवंडीत गोवरचा सर्वाधिक फैलाव झाला आहे.

घरोघरी भेट देऊन जनजागृती

फैलाव रोखण्यासाठी महापालिकेकडून घरोघरी भेट देऊन जनजागृती, तपासणी, औषधांचं वाटप करण्यात येत आहे. त्याशिवाय मुंबईत जवळपास 1 लाख 80 हजार बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात येत आहे. 

कधीपासून झाला गोवरचा प्रसार 

गोवरचा उद्रेक हा जानेवारीपासून सुरु झालाय. मात्र, आरोग्य विभागाने वेळीच दक्षता न घेतल्याने याचा उद्रेक वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात 70 तर मुंबईजवळील भिवंडीत 48 रुग्णांची नोंद झाली होती. 1 जानेवारी 2022 पासून मुंबईतही 11,390 संशयित प्रकरणांची नोंद झाली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार राज्यात 2019 मध्ये 1,337, 2020 मध्ये 2,150 आणि गेल्या वर्षी 3,668 पुष्टी झाल्याची नोंद झाली होती. या वर्षी गोवरामुळे मृत्यू झालेल्या 14 रुग्णांपैकी फक्त एकानेच लस घेतली होती, असे निवेदनात म्हटले आहे.