लग्न पत्रिकेतून सुजय विखेंचा प्रचार करणं नवरदेवाला महागात पडलं

बोहल्यावरुन नवरदेव कोर्टात...

Updated: Apr 5, 2019, 07:46 PM IST
लग्न पत्रिकेतून सुजय विखेंचा प्रचार करणं नवरदेवाला महागात पडलं title=

अहमदनगर : लग्न पत्रिकेतून सुजय विखेंचा प्रचार करणं एका नवरदेवाला चांगलंच महाग पडलं आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी बोहल्यावर चढल्यानंतर नवरदेवाला पोलीस ठाणं आणि कोर्टाची पायरी चढावी लागली. पारनेर तालुक्यातल्या निघोज गावातल्या फिरोज शेख या तरूणाचं ३१ मार्चला लग्न होतं. लग्नाच्या पत्रिकेवर फिरोजनं आहेर आणू नका पण सुजय विखेंना मतदान करा असं आवाहन केलं होतं. ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेत फिरोजविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी फिरोजला अटक झाल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. उमेदवाराचा हटके प्रचार करणं कार्यकर्त्याला भलतंच महागात पडल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे.