नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मिलिंद भालेराव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलीय. विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी पदभार स्वीकारलाय. 

Updated: Dec 30, 2017, 09:41 PM IST
नाशिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मिलिंद भालेराव  title=

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आलीय. विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी पदभार स्वीकारलाय. 

बँकेच्या अध्यक्षपदी केदार आहेर यांची बिनविरोध निवड झाली. नव्या अध्यक्षांची बिनविरोध निवड, नवनिर्वाचित केदार आहेर अध्यक्षपदी विराजमान झाल्यावर अवघ्या सात दिवसात प्रशासकाची नेमणूक झालीय. त्यामुळे हे अध्यक्षपद औट घटकेचं ठरलंय. 

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आजी माजी-अध्यक्षासह १७ संचालकांवर बँकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी दोषारोप ठेवलेत. सहकार विभागाकडून सुरू असणाऱ्या चौकशीत कलम ८८च्या अंतर्गत दोषारोप पत्र ठेवण्यात आलीत. 

सर्व संचालकांना २२ जानेवारी २०१८ ला बाजू मंडण्याची संधी देण्यात आलीय... तर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेपाठोपाठ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याच आलीय.

अप्पर निबंधक अनिल चव्हाण यांची प्रशासकपदी नेमणूक केली गेलीय. बाजार समिती गैरव्यवहारांची अनेक प्रकरण उघडकीस आली आहेत.