मीरा भाईंदरमध्ये लँडवॉर; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

 भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Updated: Sep 3, 2020, 07:46 AM IST
मीरा भाईंदरमध्ये लँडवॉर; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल  title=

मुंबई : मीरा भाईंदरचे वादग्रस्त भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जमिनीवर बेकायदा कब्जा केल्याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर जमिनीवर बेकायदा कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठेवण्यात आलायं.

नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल, कोणत्याही क्षणी अटक

भाईंदर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याआधी भाईंदरमध्ये महिला नगरसेविकेवर बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांवर दाखल करण्यात आला होता. त्यावेळी ते चर्चेत आले होते. या प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.