Crime News: दारुचे दुकान आणि.... फक्त 90 हजारासाठी मनसे नगरसेवक हे काय करुन बसला

अनिल गेडाम असे या नगरसेवकाचे नाव असून तो यवतमाळचा (Yawatmal) आहे. मनसे नगरसेवकावर झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे (Crime News). 

Updated: Jan 18, 2023, 07:38 PM IST
Crime News: दारुचे दुकान आणि.... फक्त 90 हजारासाठी मनसे नगरसेवक हे काय करुन बसला title=

श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : कायद्याने लाच घेणे आणि देणे यावर बंदी आहे. असे असताना देखील अनेक सरकारी बाबू लाच घेत असल्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत. मात्र, आता एका लोकप्रतिनीधीला अर्थता मनसे नगरसवेकाने 90 हजाराची लाच घेतली आहे. लाच घेतानाच या नगरसेवकाला रंगेहात अटक केली आहे. अनिल गेडाम असे या नगरसेवकाचे नाव असून तो यवतमाळचा (Yawatmal) आहे. मनसे नगरसेवकावर झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे (Crime News). 

अनिल गेडाम हे यवतमाळच्या वणी मारेगाव नगर पंचायतीमधील मनसेचे नगरसेवक आहे. अनिल गेडाम याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.  देशी दारूचे दुकान हटवण्यासंदर्भात तक्रार मागे घेण्याच्या मोबदल्यात गेडाम याने 90 हजार रुपयांची लाच मागितली होती. या कारवाईने मारेगावात खळबळ उडाली आहे.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनिल गेडाम हा मनसेचा विद्यमान नगरसेवक आहे. येथील प्रभागात मागील अनेक वर्षांपासून देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान हटवण्यासाठी नगरसेवक गेडाम याने नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. 
अर्थपूर्ण व्यवहार केल्यास ही तक्रार मागे घेऊ, असा निरोप गेडाम याने ज्या व्यक्तीचे हे दारुचे दुकान आहे त्याला पाठवला होता. नगरसेवकाच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या अनुज्ञप्ती धारकाने थेट अमरावती व यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

तक्रारदाराच्या तक्रारीसार कान्हाळगाव मार्गावरील देशी दारू दुकानासमोरच लाचलुचपत पथकाने सापळा रचला. यानंतर नगरसेवक गेडामला "अनुज्ञप्तीधारकाकडून 90 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या दारुची दुकाने थाटली जातात. अनेकवेळा प्रशासनाच हलगर्जीपणा तसेच राजकीय दबावामुळे अशा प्रकारच्या दुकानांवर कारवाई केली जात नाही.