रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

देवेंद्र कोल्हटकर | Updated: Aug 20, 2023, 10:05 AM IST
रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेने घेतला 'हा' निर्णय title=

 देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेची पदयात्रा निघणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसेची पदयात्रा निघणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पदयात्रा असणार आहे. 

मुंबई गोवा महामार्गासाठी निघणाऱ्या पदयात्रेत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था जनता आणि शासना समोर मनसे कडून मांडण्यात येणार असल्याची माहिती येणार आहे.

नुकत्याच  पनवेल येथे झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या आंदोलनातून मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा लावून धरण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ही पदयात्रा असेल.

तीन टप्प्यात ही यात्रा असणार आहे. पहिले  दोन टप्पे ही यात्रा चालत असेल. यानंतर तिसऱ्या टप्प्यात मनसे च्या वतीने गाव जनजागृती अभियान राबविण्यात येईल.

Advance Blood Test: एका रक्त चाचणीत होणार 18 प्रकारची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

महाराष्ट्रात रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्याची दयनीय अवस्था आहे. विशेषतः मुंबई गोवा महामार्गवर असंख्य खड्डे आहेत. सरकार गणपतीपर्यंत एक लेन तयार करणार आहे. पण या रस्त्यावर आतापर्यंत अनेक मृत्यू झाले आहेत. याबद्दल सरकार खंत व्यक्त करत नाही. समृद्धी महामार्गवर अपघात झाले त्यांना मदत देतात पण मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालेल्यानं मदत नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. 

यासाठी अमित ठाकरे हे पदयात्रा काढणार आहेत.दोन टप्प्यात रस्त्याच्या दुरवस्था दाखवणार आहेत. 23 ते 29 ऑगस्ट पर्यंत पलस्पे ते माणगाव दुसरा टप्पा भरणी नाका ते राजापूर असा असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदधिकारी, मनसैनिक गावकरी सामील होतील अशी माहिती त्यांनी दिली. राजापूर ते बांदा गाव संपर्क यात्रेत कोकण वासीयांना जमीन न विकण्यासाठी जन जागरण यात्रा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले, नेमकी कारणे जाणून घ्या