केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं मनसे आमदाराने केलं कौतुक, म्हणाले...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच कामामुळे चर्चेत असतात. त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी असून त्यांनी आपल्या कामाने छाप पाडली आहे.

Updated: Jun 8, 2022, 06:27 PM IST
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं मनसे आमदाराने केलं कौतुक, म्हणाले... title=

मुंबई: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच कामामुळे चर्चेत असतात. त्यांच्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी असून त्यांनी आपल्या कामाने छाप पाडली आहे. गडकरी म्हणजे रोडकरी असं एक समीकरणच तयार झालं आहे. नुकताच नॅशनल हायवेज असोसिएशन ऑफ इंडियाच्या कन्सल्टंट्सनी 105 तास आणि 33 मिनिटात एनएच 53 वरील एका लेनमध्ये  75 किमी बिटुमिनस काँक्रीट टाकून रस्ता तयार केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 

बिटुमनस काँक्रिटचा रस्ता सलग बांधण्याचा यापूर्वीचा विक्रम 27.25 किलोमीटर्सचा होता. कतारमधल्या अशगलमध्ये 27 फेब्रुवारी 2019 मध्ये हा विक्रम नोंदवला गेला होता. आता मनसे आमदार राजु पाटील यांनी नितीन गडकरी यांचं अभिनंदन केलं आहे.

"आपल्या कामाने केंद्रात महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब ह्यांची आणखी एक रेकॉर्डब्रेक कामगिरी. 75 किमी रस्ता केवळ 105 तास 33 मिनिटांत बांधून, भारताने विश्वविक्रम केला आहे. केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी ह्यांचे हार्दिक अभिनंदन !", असं ट्वीट मनसे आमदार राजु पाटील यांनी केलं आहे.

रस्त्याचं काम 3 जून 2022 रोजी सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी सुरु झालं आणि 5 जून रोजी सायंकाली पाच वाजता संपलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून या कामाशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं आहे.