पनवेल येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्याला पकडले

 मतदारांना पैसे वाटप करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले.  

Updated: Apr 27, 2019, 08:16 PM IST
पनवेल येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्याला पकडले title=

नवी मुंबई : पुण्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातल्या नवी मुंबईतील पनवेल जवळील कामोठे इथे मतदारांना पैसे वाटप करताना एकाला रंगेहाथ पकडण्यात आले. पैसे वाटप करणाऱ्याकडून मतदार यादी आणि वीस हजारांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला चारशे रुपये वाटले जात असताना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.

पैसे वाटणारा माणूस शेकापचा असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याला पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीचे पार्थ पवार निवडणूक रंगणात उभे आहेत.