'चितळे स्वीट्स'च्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

 १२० कामगारांना नोटीस देऊन कामावरून काढण्यात आले.

Updated: Oct 5, 2017, 10:23 AM IST
 'चितळे स्वीट्स'च्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड title=

पुणे : मिठाई साठी प्रसिद्ध असलेल्या 'चितळे स्वीट्स'च्या कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.  चितळे स्वीटस् ऍण्ड स्नॅक्स या कंपनीच्या गुलटेकडी येथील कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे १२० कामगारांना नोटीस देऊन कामावरून काढण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. दै. सामनाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

 
गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी सुमारे ७० पुरुष आणि ५० महिला आचारी व मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. पगारवाढ होत नसल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. गेल्या तीन महिन्यांपासून कामगारांनी पाच हजार रुपये पगारवाढीची मागणी केली होती. मागणी मान्य न करता कंपनीने अचानक २ ऑगस्ट रोजी कंपनीच्या गेटबाहेर नोटीस लावून सर्व कामगारांना कामावरून काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कामगार संपावर असून त्यांना काढून टाकलेले नाही, असे इंद्रनील चितळे यांनी सांगितले.