मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, 'या' लोकल रद्द होणार

Mumbai Local Train: मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत जाणून घ्या वेळापत्रक

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 24, 2023, 07:19 PM IST
मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, 'या' लोकल रद्द होणार title=
Mumbai Local Train News central railway Special Traffic And Power Block on 26 to 27 august 2023

Central Railway Mega Block: मुंबई लोकलही मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखली जाते. शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेकडून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर, काही लोकल उशीराने धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून तसं जाहीर करण्यात आलं आहे. (Mumbai Local Update)

उल्हासनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीसाठी कल्याण-अंबरनाथ विभागात किमी 57/10-12 येथे डाउन आणि अप दक्षिण-पूर्व मार्गांवर दि. २६ आणि २७ ऑगस्ट २०२३ रोजी ((शनिवार/रविवार मध्यरात्री) रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कल्याण-अंबरनाथ विभागात किमी 57/10-12 येथे रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक मध्ये उल्हासनगर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्लॅटफॉर्म २ वर पादचारी पुलाचे कॉलम स्थलांतरित करण्यासाठी आणि हायड्रा मशीनद्वारे उभारणीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळं या दिवसांत गाड्यांच्या वेळात काही बदल करण्यात आले आहेत. 

ब्लॉकचा विभाग

कल्याण ते अंबरनाथ डाउन दक्षिण-पूर्व लाईन आणि अंबरनाथ ते कल्याण अप दक्षिण-पूर्व मार्ग (कल्याण आणि अंबरनाथ दोन्ही स्थानके वगळून)

ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी

२६ आणि २७ ऑगस्ट २०२३ (शनिवार/रविवार मध्यरात्री) रात्री ०१.१० वाजल्यापासून ते ०२.१० वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 1 तास ब्लॉक असणार आहे. 

 या ट्रेनला बसणार फटका

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 11.51 वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल आणि
अंबरनाथ येथून 10.01 व 10.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या लोकल रद्द होणार आहेत.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.04 वाजता सुटणारी अंबरनाथसाठीची लोकल कुर्ला येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 12.25 वाजता सुटणारी कर्जत साठीची लोकल कल्याण स्थानकावर 01.51 ते 02.10 या वेळेत नियमित (regulated) केली जाईल.

- ब्लॉक कालावधीत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान मालवाहतूक गाड्यांची वाहतूक (ट्रॅफिक) बंद राहील.

ठाणे रेल्वे स्थानकातही गर्डरचे काम

ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ (मुंबई एंड) येथे ५.०० मीटर रुंद पादचारी पुलाचे ४ गर्डर्स लाँच करण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहे. ५.०० मीटर रुंद पादचारी पुलासाठी ४ गर्डर्स लाँच करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ (मुंबई एंड) वर ५.०० मी. रुंद पादचारी पुल ज्यात 140 टन रेल्वे क्रेन वापरून किमी ३२/२१-२२ वर अप धिम्या मार्गावर आणि डाउन जलद मार्ग (स्पॅन-४) समाविष्ट आहे.

ब्लॉकची तारीख:

दि. २६/२७.८.२०२३ (शनिवार/रविवार रात्रीची वेळ)

ब्लॉकचा कालावधी

12.50 तास ते 05.50 तास (२७.८.२०२३) म्हणजे एकून पाच तासांचा हा ब्लॉक असणार आहे. 

वाहतूक ब्लॉक विभाग

अप धीमा मार्ग: कळवा ते मुलुंड

डाउन जलद लाईन: मुलुंड ते दिवा

यामुळे ट्रेन चालण्याची पद्धत खालीलप्रमाणे असेल

ए. लांब पल्ल्याच्या गाड्या

खालील मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार येथे ५व्या मार्गावर वळवल्या जातील आणि १०-१५ मिनिटे उशिरा त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
11003 दादर- सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस
22177 मुंबई- बनारस महानगरी एक्सप्रेस

12051 मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस

बी. उपनगरीय 

अप धीम्या मार्गावरील उपनगरीय सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा, मुंब्रा आणि ठाणे स्थानकावर थांबतील.

ब्लॉक सुरु होण्यापूर्वी शेवटची लोकल: वेळापत्रकानुसार

ठाण्याहून ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी पहिली अप लोकल: T16 ठाणे येथून ०५.५६ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीताची लोकल.