पोलीस अधिकाऱ्याची सराईत गुन्हेगारांकडून हत्या

भररस्त्यात दारु पीत असताना हटकल्याने पोलिसाची हत्या

Updated: Sep 4, 2018, 01:43 PM IST
पोलीस अधिकाऱ्याची सराईत गुन्हेगारांकडून हत्या

अमरावती : अचलपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांच्यावर पहाटे 5 च्या सुमारास गुंडांनी रॉड हल्ला करून त्यांची हत्या केली. पोलीस स्थानक परिसरात त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसाच्या हत्येनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रात्री पीएसआय शुभांगी ठाकरे यांनी भररस्त्यात दारु पीत असल्याने सात ते आठ जणांना हटकले होते. आरोपींनी हा राग मनात ठेवून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे यांचा पाठलाग केला. पण पहाटेपर्यंत त्या आरोपींना कुठेच गवसल्या नाहीत. यावेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेले पोलीस कर्मचारी सह-पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल यांना अडवून त्यांच्यावर रॉडने हल्ला केला. 

शांतीलाल पटेल यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. तीन जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. शांतीलाल पटेल यांच्या पत्नी सुद्धा अचलपूर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहेत.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close