नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

Nagpur Accident: क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली.

Updated: Dec 16, 2023, 09:49 AM IST
नागपुरात क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू  title=

Nagpur Accident: नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये क्वालीस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  काल मध्यरात्रीनंतर काटोल तालुक्यातील सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान ही घटना घडली. 

क्वालिस गाडी नागपूरवरून काटोलच्या दिशेने जात होती. त्यावेळी ट्रकने जोरदार धडक दिली आणि त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात एका लग्नाचा कार्यक्रम आटपून हे सर्वजण काटोलच्या दिशेने जात होते...

जखमीला नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

लिफ्ट कोसळून कामगार ठार

सांगलीच्या मिरजेत लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यु झाला आहे,तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.कुणाल चव्हाण,असे मृत व्यक्तीचे  तर योगेश भंडारे,असे जखमी कामगाराचे नाव आहे.हे दोघे ही शहरातील दर्गा रोडवर असणाऱ्या एका चप्पल दुकानात लिफ्ट दुरुस्ती करत असताना तिसऱ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळून हा अपघात घडला आहे.मृत आणि जखमी कामगार हे कोल्हापूरच्या इचलकरंजी मधले आहेत.लिफ्ट दुरुस्तीसाठी ब्रिजेश फुटवेअर या ठिकाणी आले होते.यावेळी तिसऱ्या मजल्यावर नादुरुस्त लिफ्टचं काम करत असतान अचानकपणे लिफ्ट कोसळली,ज्यामध्ये लिफ्टच्या आत असणारा कुणाल चव्हाण जागीच ठार झाला.