Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. 

Updated: Dec 5, 2022, 09:21 AM IST
Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल  title=
Samruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल

अमर काणे, झी मीडिया, नागपूर: Samruddhi Mahamarg नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. मोठं अंतर काही तासांमध्ये पार करता येणार असल्यामुळं रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरत आहे. आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे. तुम्हीही या वाटेनं येत्या काळात प्रवास करण्याचा बेत आखत असाल, तर सर्वप्रथम तिथं तुम्हाला किती टोल भरावा लागणार आहे याबाबतची माहिती नक्की वाचा. (nagpur to shirdi samruddhi mahamarg toll rates per kilometer )

टोलची रक्कम किती याचीच सर्वांना उत्सुकता 
समृद्धी महामार्गावर नेमका किती टोल (Samruddhi Mahamarg toll rates) भरावा लागणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. समृद्धी महामार्गावर प्रति किलोमीटर चार चाकी वाहनांसाठी 1 रुपये 73 पैसे इतका टोल आकारण्यात येणार आहे. अर्थात ही रक्कम इतक्यावरच थांबत नाही, तर संपूर्ण अंतरासाठी 900 रुपयांपासून पुढे ही रक्कम वाहनांनुसार वाढत जाणार आहे. म्हणजे नागपूर ते शिर्डी (nagpur to shirdi) पर्यंतच्या 520 km अंतराकरता चारचाकी वाहनांना 900 रुपये टोलदर असेल. समृद्धी महामार्गावर  ट्रॅक्टर, तीन चाकी आणि दुचाकीला परवानगी नाही  ही बाबही इथे लक्ष देण्याजोगी. 31 मार्च 2025 पर्यंच हेच टोलदर लागू असतील असंही निश्चित करण्यात आलं आहे. 

समृद्धी महामार्गावर कोणत्या वाहनास प्रति किलोमीटर किती टोल दर? 

समृद्धी महामार्ग टोल दरपत्रक
1) मोटर, जीप , व्हॅन अथवा हलकी मोटर वाहनं
- रु.1.73 कि.मी.(प्रती किमी) / 900 रुपये 

2) हलकी व्यावसायिक वाहनं, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस
- रु 2.79 कि. मी.(प्रती किमी) / 1450 रुपये 

हेसुद्धा वाचा : मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचं फडणवीसांच्या हाती स्टिअरिंग, समृद्धी महामार्गाची पाहणी

3) बस अथवा ट्रक
 - रु 5.85 कि. मी.(प्रती किमी) / 3042 रुपये 

4) तीन आसांची  व्यावसायिक वाहने
- 6.38 कि. मी.(प्रती किमी) / 3317 रुपये 

nagpur to shirdi samruddhi mahamarg toll rates per kilometer

5) अवजड बांधकाम यंत्रसामग्री
(एचसीएम) अथवा अनेक आसांची वाहनं (एएमव्ही) चार अथवा आसांची
- रु 9.18 कि मी(प्रती किमी) / 4773 रुपये 

6) अती अवजड वाहनं (सात किंवा आठ आसानांची)
-  रु 11.17 (प्रती किमी) / 5810 रुपये