संताप अनावर होताच भाजीवाल्यानं छाटले तरुणाचे दोन्ही हात; कारण हादरवून सोडणारं

Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. क्षुल्लक कारणावरुन एका भाजीविक्रेत्याने तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 18, 2023, 10:41 AM IST
संताप अनावर होताच भाजीवाल्यानं छाटले तरुणाचे दोन्ही हात; कारण हादरवून सोडणारं title=

सतिश मोहिते, झी मीडिया, नांदेड : रागाच्या भरात अंत्यंत निर्घृण गुन्हे घडत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नांदेडमध्येही (Nanded Crime) असाच काहीसा हादरवणारा प्रकार समोर आला आहे. आपल्यावरती हसला म्हणून एका भाजीपाला विक्रेत्याने त्या तरुणाचे दोन्ही हात छाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या भाग्यनगरमध्ये बुधवारी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मोहम्मद अझहर मोहम्मद अझीझ असे हात गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर आरोपी मोहम्मह तौहिद हा सध्या फरार असल्याची माहिती पुढे आली आहे. स्थानिक पोलिसांनी (Nanded Police) याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

हसण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर एका भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणाचे दोन्ही हात आरोपीने मनगटापासून छाटले. नांदेड शहरात ही घटना घडली. कॅनॉल रोडवर आरोपी मोहम्मद तोहिद हा भाजीपाला विक्री करत होता. यावेळी हसण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांनतर आरोपी मोहम्मद तोहीद याने कोयता विकत घेऊन त्याला धार लावली. त्यांनतर पुन्हा बाजारात येऊन त्याने मोहम्मद अजहर याच्या थेट हल्ला करून त्याचे दोन्ही हात छाटले. जखमी अवस्थेत अजहरला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तरुणाचे दोन्ही हात जोडले आहेत. मात्र आरोपी फरार असून भाग्यनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

भाग्यनगरच्या डी मार्टजवळ आरोपीचे भाजी विक्रीचे दुकान आहे. फळविक्रेत्याच्या दुकानासमोर काही तरुण चालले होते. त्यातील एक तरुण फळविक्रेत्याकडे पाहून हसल्यामुळे आरोपीने कोयत्याने त्याचे दोन्ही हात छाटले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला. संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास आरोपीने मोहम्महने तरुणाचे दोन्ही हात छाटले आणि त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर देखील वार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान महिन्याभरापूर्वीसुद्धा याच परिसरात एका तरुणाचे हात छाटल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आला आहे. भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.