Nashik Graduate Elections : सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितलेला नाही, भाजपचे स्पष्टीकरण

Nashik Graduate  Election :  अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबाबत भाजपाचा काही संबंध नाही. मात्र, त्यांनी पाठिंबा मागितला तर आम्ही पार्लमेंट बोर्डाकडे जाऊ, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.  

Updated: Jan 14, 2023, 03:45 PM IST
Nashik Graduate Elections : सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितलेला नाही, भाजपचे स्पष्टीकरण title=

Nashik Graduate Constituency Election : काँग्रेसमधून (Congress) बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्याबाबत भाजपाचा काही संबंध नाही. (Maharashtra Political News) ते आमच्याकडे अजूनपर्यंत आलेले नाहीत. पाठिंबा मागितला तर आम्ही पार्लमेंट बोर्डाकडे जाऊ. राज्याच्या आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्डाकडे जाऊन. याबाबत निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेत असतो, अशी माहिती भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. (Nashik Graduate Constituency Election News in Marathi)

नाशिक पदवीधर निवडणुकीचे महानाट्य, भाजपच्या शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संपर्कात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे म्हटले होते. यावर राऊत यांच्याकडे कोण गेलं होतं?, बिनविरोध निवडणूक करा म्हणून कोणी म्हटलेले नाही. निवडणूक होऊ द्या ना, मग बघू या, असे आव्हान यावेळी बावनकुळे यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रगल्भ नेते आहेत. विरोधी पक्षाच्या चांगल्या लोकांचे कौतुक करतात.  ते नुसते टोमणे मारत नाही. कोणा पक्षामध्ये चांगला नेता असेल तर त्यांचे कौतुक करतात, असे बावनकुळे म्हणाले. सत्यजित तांबे यांचे याआधी फडणवीस यांनी कौतुक केले आहे. सत्यजित हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता काँग्रेसने त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली. मात्र, अर्ज देऊनही त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला नाही. उलट सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. या खेळीमागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात आहे.

सत्यजित तांबे यांना काँग्रेसचा पाठिंबा नाही, नाना पटोले म्हणाले - पुढचा निर्णय हायकमांड घेणार!...

राज्यसभेपासून बघा चांगल्या आमदारांनी मदत केली. विधान परिषदेला मदत केली. पुढे सरकारच बदलले. ज्या पक्षांमध्ये आपले पक्षाला आपला सांभाळता येत नाही. त्याला आम्ही जबाबदार कसे? हे कोणी आला तर आम्ही काही संन्यासी नाही. भगवे कपडे घातलेले नाही.आम्ही राजकीय पक्षाचे नेते आहोत. सत्ता म्हणजे आमचे साध्य नाही. कोणी चांगला नेता आला तर घेणारच आहोत. आम्ही अनेक ठिकाणी अपूर्ण आहोत, सहकार विभागात आमच्याकडे चांगले नेते नाही, अशी कबुली चंद्रकांत बावनकुळे यांनी दिली.

Satyajeet Tambe : नाट्यमय घडामोडी... अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून सत्यजित तांबे रिंगणात