याच भुयारातून पडला 'बँक ऑफ बडोदा'वर दरोडा!

नवी मुंबईत बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. 

Updated: Nov 14, 2017, 05:58 PM IST
याच भुयारातून पडला 'बँक ऑफ बडोदा'वर दरोडा!

नवी मुंबई : नवी मुंबईत बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं काल उघड झालं होतं.

बँकेच्या जुईनगर शाखेपासून पाच दुकानं सोडून असलेला एक गाळा भाड्यानं घेऊन त्यातून बँकेपर्यंत भुयार खणण्यात आलं होतं. समोर आलेली भुयाराची  याच बालाजी जनरल स्टोअरमधली आहेत. या भुयारामध्ये चढण्या-उतरण्यासाठी पायऱ्याही बांधून काढण्यात आल्याचं दिसतंय. गेले काही महिने गुप्तपणे हे काम सुरू असताना आसपासच्या लोकांना संशय कसा आला नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.