पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर राष्ट्रवादीचे पुन्हा आरोप

धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदीवरून आधीच वादात सापडलेले राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप करण्यात आलेत. 

Updated: Feb 7, 2018, 06:26 PM IST
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर राष्ट्रवादीचे पुन्हा आरोप title=

धुळे : धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदीवरून आधीच वादात सापडलेले राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर नवे आरोप करण्यात आलेत. 

तोरणमाळ येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीनं जयकुमार रावल यांच्यावर केलाय. काळे धनप्रकरणात बंद करण्यात आलेल्या रावल यांच्या कंपनीनं कोर्टाच्या आदेशानंतरही हे रिसॉर्ट ताब्यात ठेवलंय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाव मलिक यांनी केलाय. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावल यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय.