दहा लाखांची सुपारी घेऊन केली राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या

 दहा लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या 

Updated: Feb 10, 2020, 03:39 PM IST
दहा लाखांची सुपारी घेऊन केली राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : दहा लाखांची सुपारी घेऊन सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा दोन फेब्रुवारीला खून करण्यात आला होता. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मयत आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे स्वीयसहाय्यक गजानन पाटील यांचे यांचे भाऊ आहेत.

सांगली जिल्ह्यातील खटाव या गावात राष्ट्रवादीचे नेते आनंदराव पाटील यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. धारधार शस्त्राने वार करून आनंदराव पाटील यांना गंभीर जखमी केलं होतं. 

त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र वार वर्मी लागल्यामुळे आनंदराव पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजकीय नेत्याची हत्या झाल्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरून गेला होता.

याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपी अरविंद पाटील, लक्ष्मण मडीवाल, दत्ता जाधव, अतुल जाधव अशी अटक केलेल्या संशयितांची नाव आहेत. 

आरोपी अरविंद पाटील आणि लक्ष्मण मडीवाल यांनी पुण्यातील दत्ता जाधव आणि अतुल जाधव यांना आनंदराव पाटील यांना मारण्याची दहा लाखाची सूपारी दिली होती. व्यक्तिगत वादातून ही हत्या करण्यात आली होती.