Palghar Gang Rape : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 9 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

teenage girl gangraped in palghar : समुद्रकिनाऱ्यावर 26 वर्षीय मुलीवर 9 नराधमांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.   

Updated: Dec 21, 2022, 10:50 AM IST
Palghar Gang Rape : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 9 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार  title=

Palghar Gang Rape : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना (incidents of torture) काही कमी होताना दिसत नाही. दिल्लीतील श्रध्दा हत्याकांड प्रकरण (sharddha murder case), त्यानंतर ऍसिड फेक (delhi acid attack) प्रकरण त्यातच आता पालघरमधून (Palghar Gang Rape) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरमधील समुद्रकिनाऱ्यावरील एका बंगल्यात अल्पवयीन मुलीवर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (16 डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, बलात्काराची ही घटना 16-17 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. आरोपींनी आधी पीडितेवर एका निर्जन बंगल्यात बलात्कार केला आणि नंतर तिला समुद्रकिनारी नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केले.  

या प्रकरणानंतर अल्पवयीन मुलीने माहीम पोलीस चौकीत जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पोक्सो कायद्यासह आयपीसी 376 (ड) (सामूहिक बलात्कार), 366 (अ) (अल्पवयीन मुलीची खरेदी करणे), कलम 341, कलम 342, 323 आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी  पीडित तरुणीने पोलिसात लेखी तक्रार देताना सांगितले की,  बंगल्यावर अत्याचार केल्यानंतर आरोपी पीडित मुलीला माहीम बीचवर घेऊन गेले.

वाचा : कोरोनाचा पुन्हा उद्रेक! सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश  

त्यानंतर तिथेही आरोपींनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. 16 डिसेंबरच्या रात्री 8 वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 8 जणांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. समुद्रकिनारी झुडपात नेऊन पुन्हा अत्याचार केला. 

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी गुन्ह्यादरम्यान परिधान केलेले काही कपडे पोलिसांना सापडले आहेत. सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी लैंगिक शोषणाच्या व्हिडिओ क्लिप रेकॉर्ड करून त्यांच्या मित्रांना शेअर केल्या होत्या का? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यांच्या वीर्याचे नमुने घेण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.