अंबरनाथमध्ये नावाला नालेसफाई, गटारीचं खराब पाणी अनेक ठिकाणी घरात

अंबरनाथ शहरातील पाऊस ओसरला असला, तरी अनेक घरांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. 

Updated: Jul 2, 2019, 12:42 PM IST
अंबरनाथमध्ये नावाला नालेसफाई, गटारीचं खराब पाणी अनेक ठिकाणी घरात title=

ठाणे : अंबरनाथ शहरातील पाऊस ओसरला असला, तरी अनेक घरांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने याचा त्रास अंबरनाथच्या जनतेला सहन करावा लागतोय. अनेक घरात ड्रेनेजचे हानिकारक पाणी देखील शिरलं आहे.

नाले सफाईच्या अभाव दिसून येत असल्याने अंबरनाथकरांचे चांगलेच हाल होत आहेत. अनेकांच्या घरात गटाराच्या चेंबरचे हानिकारक पाणी शिरले आहे.

नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने नागरिकांना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. यामुळे अंबरनाथ पालिकेने नागरिकेला नागरिकांच्या जीवाची चिंता नसल्याचं दिसतंय. खराब पाण्यामुळे नेकांना घरात दिवस काढणं कठीण झालं आहे.

मुंबई उपनगरांमध्ये तीन-चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. मात्र अंबरनाथला पाऊस थांबला आहे, काही ठिकाणचं पाणी ओसरल्यानंतर देखील पाणी तुंबले आहे. 

अनेकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी पाणी वाहून आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नालेसफाई झालीच नाही, यामुळे ही समस्या उदभवल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.