24 मृत्यूंचा कोणीच दोषी नाही; चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट

 नांदेड जिल्हा रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी, चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे.  वैद्यकीय शिक्षण संचालकांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने तपासणी केली.

Updated: Oct 6, 2023, 06:57 PM IST
24 मृत्यूंचा कोणीच दोषी नाही; चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट title=

Nanded Civil Hospital News :  नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात  24 तासांत 24 मृत्यू झाला होता. 2 ऑक्टोबर रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील मृत्यु प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. 24 जणांच्या मृत्यू कोणीच दोषी नाही. चौकशी समितीकडून नांदेड जिल्हा रुग्णालयाला क्लीनचिट देण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. 

चौकशी समितीकडून क्लीन चीट

नांदेड जिल्हा रुग्णालयात 24 तासांत 24 मृत्यू प्रकरणी, चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. हे प्रकरण झी 24 तासने उघड केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण संचालकांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने तपासणी केली. मृत्यू झालेल्यांमध्ये पोषणाची समस्या असलेली नवजात बालकं आणि उपचारांना प्रतिसाद देऊ शकत नसलेले 75 ते 80 वयोगटातील रुग्णांचा समावेश होता, अशी माहिती  नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलीये. रुग्णालय प्रशासनाच्या देखरेखीच्या बाबत चौकशी समितीने समाधान व्यक्त केल्याचंही जिल्हाधिका-यांनी सांगितलं.

नांदेडच्या घटनेचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही - आरोग्य मंत्र्यांचा दावा

नांदेडच्या घटनेचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही नांदेड रुग्णालय आरोग्य विभागाच्या आखत्यावरीय येत नसल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. नांदेड रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाखाली येत असल्याने या रुग्णालयात डीन बसतात असेही त्यांनी स्पष्ट केले राज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषध खरेदी रखडलेली नाही. वेळ पडल्यास Dpdc च्या माध्यमातून खरेदी केली आहे. मात्र, राज्यातील विरोधकांनी या गोष्टीचा प्रपोगंडा केला आहे असे आरोप त्यांनी केले. असं म्हणत तानाजी सावंत यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

2 ऑक्टोबर रोजी नेमकं काय घडल?

 2 ऑक्टोबर रोजी  नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24  तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. सर्पदंश आणि विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान 62 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 27 लहान बालके आहेत. या रुग्णालयात सरासरी 12 जणांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव मृत्यूच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. 

नांदेड हॉस्पिटलमधील रुग्णमृत्यूप्रकरणी हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे 

नांदेड हॉस्पिटलमधील रुग्णमृत्यूप्रकरणी हायकोर्टानं सरकारवर ताशेरे ओढलेत. सरकारी रुग्णालयातील 50 टक्के रिक्त जागा 6 महिन्यांत भरा असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. तसंच रुग्णालयांना औषध पुरवठा करणा-या विभागानं तातडीनं औषधांचा पुरवठा करण्याचेही आदेशही देण्यात आलेत. आता या प्रकणी 30ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.