मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. 

Updated: Dec 31, 2020, 02:39 PM IST
मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी title=

अलिबाग : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू  झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींना पोलादपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ( private bus accident on Mumbai-Goa highway at Kashedi Ghat)

मुंबई ते कणकवली प्रवास करणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या बसला कशेडी घाटातील भोगाव गावाजवळ अपघात झाला. या  बसमध्ये एकूण ३२ प्रवासी प्रवास  करत होते. बस बस रस्ता सोडून ५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू  झाला. साई राणे असे मृत मुलाचे नाव आहे. तर १५ जखमींना पोलादपूर उपजिल्ह्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान, पोलादपूर पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहे. मदतकार्य सुरु आहे.