मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार!

मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.

Updated: Dec 16, 2017, 03:39 PM IST
मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक, कांदा दर कमी होणार! title=

नवी मुंबई : मुंबई बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. 150 ट्रक दाखल झाले आहेत. कांद्याचा भाव दोन रुपयांनी कमी झाला असून घाऊक बाजारात दर 20 ते 25 रुपयांवर आलाय.

नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. आज कांदा मार्केटमध्ये कांद्याचे 150 ट्रक दाखल झालेत. कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे  भाव 2 रुपयांनी कमी झालेत.

नवा कांदा 30 ते 35 रुपये किलो तर जुना कांदा 35 ते 40 रुपये किलो भावानं विकला जातोय. कांद्याची आवक अशीच राहीली तर पुढील आठवड्यात घाऊक बाजारातील कांद्याचे दर 20 ते 25 रुपये खाली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.