वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

 विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.   

Updated: Jan 25, 2019, 10:16 PM IST
 वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर title=
Pic Courtesy : Vivekanand Hospital Film

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील इतिहासकार शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना  'पद्म विभूषण' तर विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. अशोक कुकडे यांना भारत सरकारचा 'पद्मभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.  वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि भरीव काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते असलेले डॉ. अशोक कुकडे हे आरएसएसच्या विविध  पदावर कार्यरत आहेत.

लातूरमध्ये कॅन्सर रुग्णालय

 वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. अशोक कुकडे यांना 'पद्मभूषण' जाहीर

विवेकानंद प्रतिष्ठान आणि मातोश्री वृद्धाश्रमाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते वृद्धांची सेवा करत आहेत. ते मूळचे  पुण्याचे असून त्यांचे वास्तव्य हे लातूरमध्ये आहे. पुण्यातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. कुकडे यांनी गरीब लोकांसाठी काम सुरु केले. पुण्यात मागास आणि गरिब लोकांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले. त्यानंतर ते संघाच्या तालमित वाढले आणि संघाचे आचरण करु लागले. त्यांच्यावर डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यातून ते समाजसेवत मग्न झालेत. कुकडे यांच्या पुढाकाराने लातूरमध्ये कॅन्सरचे रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून ते सेवा पुरवत आहेत. लातूर सारख्या छोट्या शहरात त्यांनी वैद्यकीय काम नेटाने केले. या रुग्णालयाच्या माध्यमातून ते विविध उपक्रमही राबवत आहेत.

पुरस्कारावर पहिली प्रतिक्रिया

हा पुरस्कार मिळाल्याने आश्चर्य वाटले. आनंदही वाटला निश्चित. त्याचबरोबर मनाला सुखकारक वाटले. असा पुरस्कार मिळणे हे मनाला चांगले वाटले. हा सन्मान हा एका व्यक्तीचा नाही. तर जे काही काम झालेले झाले त्याचा हा सन्मान असतो. हे काम एक व्यक्त करु शकत नाही.