पालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

चेंबुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. एका तरुणीवर गँगरेप झाल्याने खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 19, 2023, 11:03 PM IST
पालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप; चेंबुरमध्ये घडला धक्कादायक प्रकार title=

Mumbai Crime News: पालघरच्या तरुणीवर मुंबईत गँगरेप झाला आहे. चेंबुर येथील BARC कॉलीनीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा पोलिस अधिक तपास करत आहेत. 

चेंबूर येथील बीएआरसी कॉलनी मध्ये एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. दोन तरुणांनी गँगरेप केल्याची माहिती समोर आलेय. तरुणी तिच्या घरामध्ये एकटीच असल्याचा डाव साधत तिच्याच इमारतीमध्ये राहणारा अजित कुमार यादव हा तिच्या घरी गेला. घरातील काही वस्तू हवी असल्याचं सांगून त्याने घरात प्रवेश मिळविला आणि तिच्यासोबत बोलता बोलता तिला. coldrink ऑफर करून त्यातून गुंगीचा औषध दिलं. यानंतर त्याने त्याचा मित्र प्रभाकर यादव याला या तरुणीचा घरी बनवून आळीपाळीने दोघांनी तिच्यावर गॅंग रेप केला आणि तेथून फरार झाले.

तरुणी शुद्धीत आल्यावर तिला आपल्या सोबत काहीतरी अनुचित घडलं असल्याची जाणीव झाली. तिने आपल्या कुटुंबीयांना याची कल्पना दिली. चेंबूर पोलीस ठाण्यात या तरुणीने अजित कुमार यादव आणि प्रभाकर यादव यांच्या विरोधात गॅंग रेप चा गुन्हा दाखल केला.

या दोन्ही आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता 20 नोव्हेंबर पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. पीडित तरुणी ही मूळची पालघरची असून तिचे वडील हे बीएआरसी मध्ये कामाला असल्याने त्यांना बीएआरसी कॉलनी मध्ये फ्लॅट मिळाला होता. तरुणी ही आपल्या वडिलांकडे आली असताना तिच्यासह हा दुर्दैवी प्रकार घडला. आरोपी अजितकुमार हा देखील याच तरुणीच्या इमारतीमध्ये राहतो त्यामुळे या दोघांची ओळख असल्यामुळे अजित कुमार याला या तरुणीने घरात घेतलं आणि पुढे ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.