Pankaja Munde : पंकजा मुंडे नाराज, फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रमाकडे पाठ

 Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नाराज आहेत. त्यांनी फडवणीस यांच्या उपस्थित असलेल्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा आहे.

Updated: Jan 15, 2023, 12:23 PM IST
Pankaja Munde : पंकजा मुंडे नाराज, फडणवीस यांच्या उपस्थित कार्यक्रमाकडे पाठ title=
Pankaja Munde angry

 Pankaja Munde : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भाजपमधल्या नाराजीची पुन्हा चर्चा होत आहे. ( Maharashtra Political News) निमित्त आहे ते बीडमधल्या गहिनीनाथ गडावरच्या कार्यक्रमाचं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र पंकजा आणि खासदार प्रीतम मुडे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. या दोघी कार्यक्रमाला येणार नसल्याची माहिती मिळत आहे. ( Maharashtra Political News in Marathi)

संत वामनभाऊ यांचा 47 वा पुण्यतिथी सोहळा आहे. त्यानिमित्ताने गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी राज्यातून लाखो भक्त येतात. याचनिमित्याने गहिनीनाथ गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील हजेरी लावणार आहेत.

बीड जिल्ह्यावर फडणवीस यांचे विशेष लक्ष

पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यावर फडणवीस यांनी विशेष लक्ष दिल्याचीही चर्चा आहे. कारण गेल्या 15 दिवसांमधला फडणवीस यांचा हा दुसरा दौरा आहे. एक जानेवारीला दिवंगत विनायक मेटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रमातही पंकजा मुंडे यांनी पाठ फिरवली होती. तेव्हा मुंडे भगिनींच्या अनुपस्थितीवरुन राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी म्हटले आहे की, पंकजा या भाजपच्या नेत्या आहेत. त्यांचे रक्त हे भाजपचेच आहे. त्यामुळे त्या कुठेही जाणार नाहीत.

पंकजा मुंडे यांना ठाकरे गटाची ऑफर?

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांनी अनेकवेळा पक्षाच्या नेत्यांवर टीका करुन आपली नाराजीही व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु असताना त्यांना थेट ठाकरे गटाने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे.

शिवसेनेचे (Shivsena) ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी पाथर्डी तालुका दौऱ्यावर असताना विविध ठिकाणी शिवसेनेच्या शाखांचं उद्घाटन केले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नाराजीबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. पण पंकजा  यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसत आहे. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचे शिवसेना पक्षात स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली होती. त्यामुळे त्याच्या ऑफरची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.