अपात्र 6 झेडपी सदस्यांना पंकजा यांचा दिलासा

या सहा सदस्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपला साथ दिली होती. या सहा जिल्हा परिषद सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

Updated: Oct 23, 2017, 11:54 PM IST
अपात्र 6 झेडपी सदस्यांना पंकजा यांचा दिलासा title=

बीड : बीडच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलासा दिला आहे.  कारण पक्षादेश डावलल्याचा ठपका ठेवत या सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. या सहा सदस्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपला साथ दिली होती. या सहा जिल्हा परिषद सदस्यांचं पद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून दिलासा

मात्र, अपात्र ठरलेल्या सहाही सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धाव घेतली होती. पंकजा यांच्याच ताब्यात जि.प. असल्याने त्यांनी भाजपला थेट सहकार्य करणाऱ्या पाच आणि क्षीरसागर समर्थक एका सदस्याला दिलासा देत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरित स्थगिती दिली.

ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिव आर. एम. गेंगजे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना याबाबत कळवलं आहे.

मात्र हे प्रकरण येथेच थांबेल असं वाटत नाही, कारण ग्राम विकास मंत्र्यांच्या आदेशाला देखील कोर्टात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अपात्रतेची कारवाई झाली त्या सदस्यांची नावे

शिवाजी पवार (पाडळी), अ‍ॅड. प्रकाश कवठेकर (डोंगरकिन्ही), अश्विनी जरांगे (अंमळनेर), संगीता महानोर (दौलावडगाव), अश्विनी निंबाळकर (हरि नारायण आष्टा) सर्व धस समर्थक आणि मंगल डोईफोडे (पिंपळनेर) आ. क्षीरसागर समर्थक या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई झाली होती.