पंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध

पंकजा मुंडे समर्थक आणि महंत यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता

Updated: Aug 30, 2018, 07:31 PM IST
पंकजा समर्थकांची भगवान गडावर मेळाव्याची हाक, नामदेव शास्त्रींचा पुन्हा विरोध title=

बीड: पंकजा मुंडे समर्थक फुलचंद कराड यांनी भगवान गडावर आरक्षण मेळावा घेणारच अशी भूमिका घेतली आहे. या मेळाव्याला नामदेवशास्त्रींनी नेहमीप्रमाणे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे यंदाही भगवान गडावर पंकजा मुंडे समर्थक आणि महंत यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. महंत नामदेवशास्त्री यांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात पत्रही पाठवले आहे.

गेल्यावर्षीही दसरा मेळाव्यावरून कजा मुंडे आणि भगवानगडाचे मठाधिपती महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्यात  मोठा वाद झाला होता. नामदेव शास्त्रींनी गडावर मेळाव्याला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेतली होती. त्यावर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच नमते घेत भावनिक साद घातली होती. "मी लहान होते, तुम्ही मोठे व्हा" काही नको फक्त 20 मिनिटं वेळ द्या अशी मागणी त्यावेळी पंकजा मुंडे यांनी केली होती.