गाड्या जाळणाऱ्या या माथेफिरूंचं करायचं तरी काय?

सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Jaywant Patil Updated: Mar 31, 2018, 01:13 AM IST

पुणे : पुण्यामधल्या धायरीतील रायकर मळा इथे बुधवारी मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तीनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या तीन गाड्यांना आग लावली.  या आगीत ऑडी आणि होंडासिटीसह तीन गाड्या जळाल्या. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. ज्यात दुचाकीवरून आलेल्या या दोन व्यक्ती गाडीला आग लावताना स्पष्ट दिसत आहे. सिंहगड रोड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.